Good News! दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर बुलडाण्यात ऑक्सिजन प्लांट सुरू!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनविारुद्धच्या दीर्घ लढाईत महत्वाचे शस्त्र ठरणारा शहरातील कोविड समर्पित रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट खऱ्या अर्थाने आज 2 मार्चपासून कार्यान्वित झाला आहे. गंभीर कोरोना रुग्णच नव्हे इतर रुग्णांसाठी देखील हा टँक जीवनदायी ठरणार आहे.बुलडाणा- अजिंठा मार्गावरील राज्यात सुपरिचित क्षय आरोग्यधाम परीसरात सुसज्ज महिला रुग्णालय उभारण्यात आले. 2014 मध्ये भूमिपूजन …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनविारुद्धच्या दीर्घ लढाईत महत्वाचे शस्त्र ठरणारा शहरातील कोविड समर्पित रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट खऱ्या अर्थाने आज 2 मार्चपासून कार्यान्वित झाला आहे. गंभीर कोरोना रुग्णच नव्हे इतर रुग्णांसाठी देखील हा टँक जीवनदायी ठरणार आहे.
बुलडाणा- अजिंठा मार्गावरील राज्यात सुपरिचित क्षय आरोग्यधाम परीसरात सुसज्ज महिला रुग्णालय उभारण्यात आले. 2014 मध्ये भूमिपूजन झालेले हे रुग्णलाय 2020 साकारले. तोपर्यंत बुलडाणा शहर व जिल्ह्यात एन्ट्री करणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी व उपचारासाठी हे कोरोना समर्पित रुग्णालय थाटण्यात आले. जीवन मरणाची लढाई लढणाऱ्या गंभीर रुग्णामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यासाठी व भविष्यात बुलडाण्याच्या भूमीत साकारणाऱ्या मेडिकल कॉलेजसाठी देखील उपयुक्त ठरणाऱ्या 20 हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची याच रुग्णालयात उभारणी करण्यात आली. टॅंक उभे राहिले पण त्यासाठी आवश्यक लिक्विड ऑक्सिजन तब्बल 5 महिने निविदारूपी झारीत अडकले! अखेर हा गुंता सुटला असून, लिक्विड ऑक्सिजन घेऊन येणारी यंत्रणा सोमवारी बुलडाण्यात येऊन पोहोचली. आज मंगळवारी खऱ्या अर्थाने हा प्लांट कार्यन्वित झालाय! यामुळे कोविड रुग्णालयाची नियमित 1400 क्यूबिक लिटर ऑक्सिजनची मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सांगितले.