Good News! बांधकाम क्षेत्राला दिलासा… आणखी 8 रेती घाटांच्या इ- लिलावास हिरवी झेंडी; 8 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील आणखी 8 रेती घाटांच्या इ- लिलावाचा मार्ग मोकळा झाला असून, या हर्रासीतून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शासनाच्या तिजोरीत किमान 8 कोटी रुपयांची भर पडणार आहे. तसेच रेती विना अडचणीत आलेल्या बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. यापूर्वी झालेल्या लिलावामुळे जिल्ह्यात हजारो ब्रास रेती उपलब्ध झाली. तसेच शासनाला कोट्यवधींचा …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील आणखी 8 रेती घाटांच्या इ- लिलावाचा मार्ग मोकळा झाला असून, या हर्रासीतून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शासनाच्या तिजोरीत किमान 8 कोटी रुपयांची भर पडणार आहे. तसेच रेती विना अडचणीत आलेल्या बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.

यापूर्वी झालेल्या लिलावामुळे जिल्ह्यात हजारो ब्रास रेती उपलब्ध झाली. तसेच शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळाला. यापाठोपाठ आता नव्याने 8 रेती घाटाच्या ऑनलाइन लिलावास मान्यता मिळाली. यामध्ये देऊळगावराजा तालुक्यातील नारायणखेड व निमगाव गुरू, नांदुरा तालुक्यातील पलसोडा (ब), भोटा, रोटी- अ , रोटी – ब, येरळी, टाकळी वतपाळ, खेडगाव- ब आणि शेगाव तालुक्यातील या घाटांचा समावेश आहे.

असा होणार इ- लिलाव

दरम्यान 17 मार्चपासून संगणकीय नोंदणीस सुरुवात होऊन ती आज 19 मार्चला संध्याकाळी 6 ला बंद झाली. 24 मार्चच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन  निविदा भरता येणार आहे. 25 मार्चला सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत इ लिलाव करण्यात येईल. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात इ टेंडर उघडण्यात  येणार आहे.