Good News! महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस संघात बुलडाण्याच्‍या सृष्टी होलेची निवड

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ज्युनिअर राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून १५ व्या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्याची एकमेव खेळाडू सुष्टी अतुल होलेची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे. याशिवाय जळगाव येथे नुकतीच ७ वी महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा झाली. तीत सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ज्युनिअर राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून १५ व्‍या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्याची एकमेव खेळाडू सुष्टी अतुल होलेची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे. याशिवाय जळगाव  येथे नुकतीच ७ वी महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा झाली. तीत सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलडाणा व स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्‍या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

बुलडाणा जिल्हा संघाचे नाव खेळाडूंनी राज्य स्तरावर चमकविले असून, या  राष्ट्रीय स्पर्धा गुजरात अहमदाबाद येथे होणार आहेत. या खेळाडूंना सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय यांचे मार्गदर्शन लाभत आहे.  राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलडाणाचे खेळाडू देवश्री हेमंत जगताप, विनिता बाबुलाल खेडद, भक्ती केशव साळुंके व तनिष्क राहुल तायडे यांची त्‍यांच्या चमकदार  खेळामुळे महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २१ ते २५ मार्च दरम्यान अहमदाबाद गुजरात येथे होणार असून महाराष्ट्र संघ  २० मार्च ला रवाना होणार आहेत.  बुलडाणा जिल्ह्यातील खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल आमदार राजेश एकडे,  मार्गदर्शक नामदेव शिरगावकर, सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनिल पूर्णपात्रे, सहसचिव रवींद्र सोनवणे, संजय सबनीस  जिल्हा क्रीडाधिकारी, अनिल इंगळे तालुका क्रीडा अधिकारी, संतोष बोरगावकर अध्यक्ष सॉफ्ट टेनिस असो बुलडाणा, राजेश महाजन कार्याध्यक्ष, डॉ. राहुल चोपडे, अनिकेत चांडक, उपाध्यक्ष, विजय पळसकर, सचिव सॉफ्ट टेनिस असो. बुलडाणा, राजेश्वर खंगार भरतकुमार  मुंदडा ,चंद्रकांत साळुंके , नितीन भुजबळ,  विनोद राजदेव आदींनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.