Good News! रेती घाटांचा मार्ग पुन्हा मोकळा; न्यायालयाने फेटाळले ‘ते’ अपील, शासनाला मिळणार 8 कोटींचा महसूल

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यातील रेती घाटांच्या ई- लिलावाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने रेती घाटांच्या लिलावातील अडथळा पुन्हा दूर झालाय! यामुळे बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रासह हजारो मजूर, कंत्राटदारांना दिलासा मिळाला आहे.यापूर्वी पहिल्या टप्प्यातील 31 पैकी 12 घाटांसाठी इ लिलाव प्रक्रिया पार पडली होती. यासाठी 4.84 कोटी …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यातील रेती घाटांच्या ई- लिलावाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने रेती घाटांच्या लिलावातील अडथळा पुन्हा दूर झालाय! यामुळे बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रासह हजारो मजूर, कंत्राटदारांना दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी पहिल्या टप्प्यातील 31 पैकी 12 घाटांसाठी इ लिलाव प्रक्रिया पार पडली होती. यासाठी 4.84 कोटी इतकी ऑफसेट प्राइझ निर्धारित करण्यात आली होती. त्या तुलनेत लिलावातून 7.97 कोटी रुपये इतकी बोली लावण्यात आली. यामुळे शासनाच्या तिजोरीत लक्षणीय भर पडली. दरम्यान या प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. ऑफसेट प्राइझमधील तफावत अपिलातील मुख्य मुद्दा होता. यावर तात्पुरती स्थगिती देत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. तसेच जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनात खनिकर्म विभागाने राबविलेली इ लिलाव प्रक्रिया न्यायालयाने योग्य ठरविली. यामुळे पुढील टप्प्यातील रेती घाट लिलावांचा तसेच जिल्ह्यात वाजवी दरात रेती उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.