Good News… वृद्ध साहित्यिक, कलावंतांना मिळणार मानधन; 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सन 2020-21 साठी मानधन घेऊ इच्छिणाऱ्या सर्व वृद्ध कलावंतांना मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत सादर करावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 25 ऑगस्ट 2021 ची मुदत आहे. यापूर्वी या योजनेसाठी केलेले सर्व अर्ज दप्तर जमा झाल्याने ते अर्ज विचारात घेतले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सन 2020-21 साठी मानधन घेऊ इच्छिणाऱ्या सर्व वृद्ध कलावंतांना मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत सादर करावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 25 ऑगस्ट 2021 ची मुदत आहे.

यापूर्वी या योजनेसाठी केलेले सर्व अर्ज दप्तर जमा झाल्याने ते अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. अर्जातील नमूद अटींची पूर्तता करणाऱ्या व आवश्यक त्या मूळ कागदपत्रांच्या छाननी अंतीचा पुरावा कागदपत्रासह सादरकेलेले केवळ वैध आणि योग्य अर्जच स्वीकारले जाणार असल्याने यासंबंधित नियम व अटी, शर्ती अर्जदारांनी काळजीपुर्वक वाचूनच अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज, अपूर्ण अर्ज, पुरावे नसलेले अर्ज किंवा पूर्वीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना पंचायत समिती कार्यालय येथे उपलब्ध आहे. मानधन घेऊ इच्छिणाऱ्या सर्व वृद्ध कलावंतांनी 25 ऑगस्ट 2021 पर्यंत या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.