आयजींना भेटून बाहेर पडलेले आमदार गायकवाड म्‍हणाले, भांडणानं जिल्ह्याचं भलं होणार नाही!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल आमदार संजय कुटे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय राड्यामुळे अवघे शहर, जिल्ह्याची अवघी पोलीस यंत्रणा वेठीस धरली गेली. कुटेंनी विषयावर पडदा टाकूनही पुन्हा त्यांच्यावर दगडफेक झाली. परतताना मोताळ्यातही हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घटनांची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून, काल रात्रीच विशेष पोलीस महानिरिक्षक चंद्रकिशोर मीना बुलडाण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काल आमदार संजय कुटे आणि आमदार संजय गायकवाड यांच्‍यातील राजकीय राड्यामुळे अवघे शहर, जिल्ह्याची अवघी पोलीस यंत्रणा वेठीस धरली गेली. कुटेंनी विषयावर पडदा टाकूनही पुन्‍हा त्‍यांच्‍यावर दगडफेक झाली. परतताना मोताळ्यातही हल्ल्‍याचा प्रयत्‍न झाला. या घटनांची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून, काल रात्रीच विशेष पोलीस महानिरिक्षक चंद्रकिशोर मीना बुलडाण्यात दाखल झाले. आज, 20 एप्रिला सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात ते आले आणि पोलीस अधीक्षकांकडून कालच्‍या प्रकाराची माहिती जाणून घेत आहेत. आमदार संजय गायकवाड यांनाही बोलाविण्यात आलं होतं. त्‍यांच्‍याशी श्री. मीना यांनी चर्चा केली.  पाऊणतास चर्चा केल्यानंतर बाहेर पडलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना सांगितलं, की जिल्ह्यात एकीकडे कोरोना वाढतोय. कोरोनाकडे दूर्लक्ष होत चाललंय. पोलीस प्रशासनावर ताण येतो. दुसरीकडे सोशल मीडियावर ज्‍या काही कमेंट चालल्यात. त्‍याचा दोन्‍हीकडून सकारात्‍मक विचार व्‍हायला पाहिजेत. भांडणामुळे जिल्ह्याचं भलं होणार नाही. हे सर्व थांबविण्यासाठी सर्व महाविकास आघाडीचे नेते आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार आहेत, असे ते म्‍हणाले. श्री. मीना यांच्‍याशी चर्चा करतेवेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार प्रदीप साळुंखे उपस्‍थित होते.

कुटेंचा रस्ता रोखणाऱ्या ५ आरोपींना अटक आणि सुटका

काल आमदार कुटे यांचे वाहन अडविल्या प्रकरणी पृथ्वीराज गायकवाड व इतर ४ जणांना अटक करण्यात आली. त्‍यांची जामिनावर सुटका झाली आहे. शहर पोलिस ठाण्यात रात्रीच याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अकोला जिल्ह्यातून दंगा काबू पथक आज सकाळी दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.