Lockdown आदेशात सुधारणा… संचारबंदीत लग्‍नासाठी तहसीलदारांची परवानगी आवश्यक, परीक्षार्थीना ओळखपत्र तर प्रवाशांना तिकीट बाळगणे बंधनकारक

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकाऱ्यांनी 5 एप्रिल रोजी निर्गमित केलेल्या कडक निर्बंधांच्या आदेशात सुधारणा करून काल, 6 एप्रिलला रात्री उशिरा शुद्धीपत्रक जारी केले आहे. यात प्रामुख्याने संचारबंदी काळातील दैनंदिन व्यवहारावर फोकस करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेदरम्यान म्हणजे 59 तासांच्या कर्फ्यू काळात लग्न असेल तर संबंधितांना …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  जिल्हाधिकाऱ्यांनी 5 एप्रिल रोजी निर्गमित केलेल्या कडक निर्बंधांच्या आदेशात सुधारणा करून काल, 6 एप्रिलला रात्री उशिरा शुद्धीपत्रक जारी केले आहे. यात प्रामुख्याने संचारबंदी काळातील  दैनंदिन व्यवहारावर फोकस करण्यात आले आहे.

शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेदरम्यान म्हणजे 59 तासांच्या कर्फ्यू काळात लग्न असेल तर संबंधितांना तहसीलदारांची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. याच धर्तीवर या काळात घरगुती काम करणारे, स्वयंपाकी, वाहन चालक यांनाही तहसीलदारांची परवानगी घेणे आवश्यक राहील. या कालावधीत परीक्षेला जाणाऱ्या वा येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत ओळखपत्र तर प्रवाशांनी सोबत तिकिट बाळगणे बंधनकारक राहील. उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना ओळखपत्र सोबत बाळगून खासगी वाहनाद्वारे कामावर ये- जा करता येईल. लस, जीवनरक्षक औषधीची वाहतूक करण्यास मुभा राहणार आहे.

खासगी आस्थापनांना ‘ते’ प्रमाणपत्र आवश्यक

दरम्यान 30 एप्रिल पर्यंत खासगी आस्थापनासाठी निर्देश देण्यात आले आहे. तेथील कर्मचाऱ्यांना कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. 10 एप्रिलपासून त्यांनी  आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.

अत्यावश्यक मध्ये यांचा समावेश

  • पेट्रोल पंप व पेट्रोलियम
  • डेटा सेंटर, क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, माहिती तंत्रज्ञान आणि सेवा
  • कार्गो सेवा
  • फळविक्रेते, टायर पंक्चर
  • पूर्वनिर्धारीत परीक्षा