MH43 R 3099… लाल रंगाची कार आहे… खामगावच्‍या पेट्रोलपंपावर केले चुकीचे काम!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः MH43 R 3099… क्रमांकाची लाल कार तुमच्या नजरेस पडली तर लगेच खामगाव ग्रामीण पोलिसांना कळवा. कारण ही कार खामगावजवळील बुलडाणा-चिखली बायपावर एक चुकीचे काम करून पसार झाली आहे. २ हजार रुपयांचे पेट्रोल भरले अन् चालक पैसे न देताच कारसह भुर्र उडाला… विजयलक्ष्मी पेट्रोलपंपाचे मालक चंद्रप्रकाश भास्कर तायडे …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः MH43 R 3099… क्रमांकाची लाल कार तुमच्‍या नजरेस पडली तर लगेच खामगाव ग्रामीण पोलिसांना कळवा. कारण ही कार खामगावजवळील बुलडाणा-चिखली बायपावर एक चुकीचे काम करून पसार झाली आहे. २ हजार रुपयांचे पेट्रोल भरले अन्‌ चालक पैसे न देताच कारसह भुर्र उडाला…

विजयलक्ष्मी पेट्रोलपंपाचे मालक चंद्रप्रकाश भास्कर तायडे यांनी या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्‍हटले आहे, की 25 फेब्रुवारी रात्री सव्वा नऊच्‍या सुमारास पेट्रोल पंपावर ही लाल कार पेट्रोल भरण्यास आली होती. कार चालकाने कर्मचाऱ्याला 2 हजार रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने पेट्रोल भरले. पेट्रोल भरताच चालकाने पैसे न देता भरधाव वेगाने कार चालवत निघून गेला. आरडाओरड होईपर्यंत कार गायबही झाली.