एफ. एम. काशेलानी इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे कोरोना योद्धाचा सन्मान

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सामान्यांच्या रक्षणासाठी कंबर कसून मैदानात उतरलेल्या कोरोना वॉरियर्सचा शेगाव येथील एफ. एम. काशेलानी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 6 जानेवारीला सत्कार करण्यात आला. नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी, ठाणेदार सागर गोडे, डॉ. प्रविण नागरगोजे, डॉ. संध्या नागरगोजे, डॉ. गणेश खटोड आदींची प्रमुख …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सामान्यांच्या रक्षणासाठी कंबर कसून मैदानात उतरलेल्या कोरोना वॉरियर्सचा शेगाव येथील एफ. एम. काशेलानी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 6 जानेवारीला सत्कार करण्यात आला. नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी, ठाणेदार सागर गोडे, डॉ. प्रविण नागरगोजे, डॉ. संध्या नागरगोजे, डॉ. गणेश खटोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचार्‍यांचा या वेळी सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शाळेचे अध्यक्ष मनोज काशेलानी, संचालक कुणाल काशेलानी, मुख्याधापक प्रविण ठाकरे यांच्या हस्ते सर्व कोरोना योद्ध्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करणात आला. सूत्रसंचालन शुभम देशमुख यांनी केले.