OLX वर स्वस्‍तात वाहन विक्रीच्‍या आमिषाने बोलावून साडेतीन लाखांना गंडा!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जयरामगड भागात दोन दिवसांपूर्वीच कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी 5 अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर पुन्हा मोठ्या लुटीची एक तक्रार दाखल झाल्याने पोलीस हैराण झाले आहे. भुसावळ तालुक्यातून आलेल्या तरुणास शिर्ला नेमाने येथील सत्संग मठाजवळ बोलावून साडेतीन लाखांनी लुटण्यात आले. ओएलएक्सवर स्वस्तात वाहन विक्रीची जाहिरात करून …
 
OLX वर स्वस्‍तात वाहन विक्रीच्‍या आमिषाने बोलावून साडेतीन लाखांना गंडा!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जयरामगड भागात दोन दिवसांपूर्वीच कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी 5 अट्टल गुन्‍हेगारांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या होत्‍या. त्‍यानंतर पुन्‍हा मोठ्या लुटीची एक तक्रार दाखल झाल्‍याने पोलीस हैराण झाले आहे. भुसावळ तालुक्‍यातून आलेल्या तरुणास शिर्ला नेमाने येथील सत्‍संग मठाजवळ बोलावून साडेतीन लाखांनी लुटण्यात आले. ओएलएक्‍सवर स्‍वस्तात वाहन विक्रीची जाहिरात करून त्‍याला बोलाविण्यात आले होते. ही घटना आज, 22 मे रोजी घडली असली तरी तरुणाने काल, 1 जूनला हिवरखेड पोलिसांत तक्रार दिली.

चेतन दत्तू महाजन (23, रा. साक्री फाटा, ता. भुसावल, जि. जळगाव) असे लुटले गेलेल्याचे नाव असून, दुर्जन किसन शिंदे (45 रा. जयरामगड ता. खामगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याने ओएलएक्स वेबसाईटवर स्वस्तात वाहन विक्रीची जाहिरात टाकली होती. ती चेतनने पाहिली व वाहन घेण्याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. वाहन घेण्यासाठी शिर्ला नेमाने (ता. खामगावग येथील सत्‍संग मठाजवळ त्‍याला बोलाविण्यात आले. 22 मे रोजी सकाळी 11 च्या सुमारास तो मठाजवळ आला असता दुर्जन शिंदे व त्याच्या 10 ते 12 सहकाऱ्यांनी तलवार, चाकू, भाला अशा शस्त्राचा धाक दाखवून त्‍याच्‍याकडून नगदी 3 लाख 20 हजार व 31 हजारांचे 3 मोबाइल असा एकूण 3 लाख 51 हजारांचा माल लुटून नेला. चेतनच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी दुर्जन शिंदे व त्‍याच्‍या साथीदारांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार प्रवीण तळी करत आहेत.