On Record… जिल्ह्यात दहा दिवसांत ‘ॲट्रॉसिटी’च्‍या पाच तक्रारी!; संशयितांविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या दहा दिवसांत पाच ॲट्रॉसिटीचे गुन्हे जिल्ह्यात दाखल आहेत. काल आणि आज (९ व १० जुलै) दोन तक्रारी दाखल झाल्या असून, त्यावरून धाड आणि हिवरखेड पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ८ जुलै, मेहकर पोलीस ठाण्यात ६ जुलै आणि नांदुरा पोलीस ठाण्यात ५ जुलैला ॲट्रॉसिटीची तक्रार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्या दहा दिवसांत पाच ॲट्रॉसिटीचे गुन्‍हे जिल्ह्यात दाखल आहेत. काल आणि आज (९ व १० जुलै) दोन तक्रारी दाखल झाल्या असून, त्‍यावरून धाड आणि हिवरखेड पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्‍हे दाखल केले आहेत.

जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ८ जुलै, मेहकर पोलीस ठाण्यात ६ जुलै आणि नांदुरा पोलीस ठाण्यात ५ जुलैला ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल होऊन संशयितांविरुद्ध गुन्‍हे दाखल झाले. काल, ९ जुलैला त्‍यात दोन गुन्ह्यांची भर पडली. हिवरखेड पोलीस ठाण्यात ९ जुलैला एका ५० वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आज, १० जुलैला ३८ वर्षीय व्‍यक्‍तीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना उमरा अटाळी (ता. खामगाव) येथे ८ जुलैला घडली होती. तुमच्‍या शेतातून लोकांना का जाऊ देता? ते माझ्या शेतात येतात, असे म्‍हणून श्रीकृष्ण रामकृष्ण जानोकार (रा. उमरा अटाळी) यांनी या महिलेला अश्लील व जातीवाचक शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

दुसरी घटना डोमरूळ (ता. बुलडाणा) येथे समोर आली आहे. सौ. जिजाबाई सांडू जाधव (५५) यांच्‍या तक्रारीवरून सुनिल जानराव पडोळ (४४), शारदा सुनिल पडोळ (४०), आशिष सुनिल पडोळ (२५), बाबुराव आनंदा पडोळ (६८, सर्व रा. डोमरूळ) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. स्मशानभूमीच्‍या जागेत कंपाउंड करण्यासाठी गेलो असता संशयितांनी आम्हाला लोटपाट केली. यात जिजाबाईंच्‍या उजव्या पायाला तारेची जखम झाल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. आमच्याकडे भरपूर पैसा आहे. माझे काका व भाऊ बुलडाण्यावरून गुंडाची गाडी भरून आणतील, असे धमकावल्याचेही तक्रारीत म्‍हटले आहे. अश्लील व जातीवाचक शिविगाळ केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास धाड पोलीस करत आहेत.