गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १९ वर्षीय गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना अमडापूर पोलिसांनी आज, १७ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. शेख इलियास शेख सत्तार (५७) व चांद खाँ रहीम खाँ (५५, दोघेही रा. अमडापूर ता. चिखली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघांना आज न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात …
 
गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १९ वर्षीय गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना अमडापूर पोलिसांनी आज, १७ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. शेख इलियास शेख सत्तार (५७) व चांद खाँ रहीम खाँ (५५, दोघेही रा. अमडापूर ता. चिखली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघांना आज न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

१९ वर्षीय गतिमंद तरुणीवर दोघांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना अमडापूर येथे १५ सप्टेंबर रोजी घडली होती. पीडितेच्या आईने याप्रकणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. गतिमंद तरुणीची आई दुपारी शेतात काम करण्यासाठी गेली असताना मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून शेख इलियास आणि चांद खाँ हे मुलीच्या घरात घुसले होते. दोघांनी बळजबरी आळीपाळीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला होता. पीडित तरुणीची आई घरी आल्याचे कळताच दोघांनी तेथून पळ काढला होता. दोन्ही आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.