Shocking ! आता कर्मचाऱ्यांच्‍या कुटुंबावर टांगती तलवार!! स्वॅब नमुने संकलन सुरू, बुलडाणा तहसीलची व्यथा अन्‌ कथा

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तहसील कार्यालयात कोरोनाचा स्फोट झाला असून, 9 मार्चच्या दुपारी हा आकडा 19 वर पोहोचला! कर्मचाऱ्यांवरील टांगती तलवार कोसळली असतानाच ही धोक्याची तलवार आता त्यांच्या कुटूंबियावर टांगती असल्याचे दुर्दैवी तितकेच गंभीर चित्र आहे. 4 ते 8 मार्चदरम्यान बुलडाणा तहसीलमधील तब्बल 19 कर्मचारी कोरोनाग्रस्त झाल्याचे निष्पन्न झाले. एका …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तहसील कार्यालयात कोरोनाचा स्फोट झाला असून, 9  मार्चच्या दुपारी  हा आकडा 19 वर पोहोचला! कर्मचाऱ्यांवरील टांगती तलवार कोसळली असतानाच ही धोक्याची तलवार आता त्यांच्या कुटूंबियावर टांगती असल्याचे दुर्दैवी तितकेच गंभीर चित्र आहे.

4 ते 8 मार्चदरम्यान बुलडाणा तहसीलमधील तब्बल 19 कर्मचारी कोरोनाग्रस्त झाल्याचे निष्पन्न झाले.  एका कर्मचाऱ्यात कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने  व त्याचा अहवाल लवकरच मिळणार असल्याने एकूण आकडा 20 च्या घरात पोहोचण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या परिणामी तहसील कार्यालय हादरले असून, बाधितच नव्हे तर निगेटिव्ह आलेले कर्मचारीदेखील हवालदिल झाल्याचे भीषण चित्र आहे. 19 कर्मचारी सर्वांपासून दूर (आयसोलेशनमध्ये ), बचावलेले मोजके कर्मचारी गंभीर मुद्रेने कार्यालयात बसलेले, त्यांना अधूनमधून बोलते करून धीर देणारे तहसिलदार रुपेश खंडारे अन्‌ कार्यालयातच नव्हे तर मेन गेटपर्यंत असलेला शुकशुकाट व भयाण शांतता असे चित्र तहसीलमध्ये दिसून आले.

…त्यांनाही करावी लागणार दीर्घ प्रतीक्षा

या भीषण पार्श्वभूमीवर आता धोक्याची टांगती तलवार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या दिशेने सरकली आहे. आता 19 बाधितांच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब नमुने संकलित करण्यात येत आहे. कमीअधिक 65 जणांचे नमुने संकलित करण्यात आल्यावर त्याची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. याचा अहवाल यायला 3 दिवस लागतील. तोपर्यंत या सदस्याच्या  डोक्यावरील आणि अप्रत्यक्षपणे तहसीलवरील धोक्याची टांगती तलवार कायम राहणार आहे.