सहा सिंचन प्रकल्प तुडूंब!; नदीकाठच्या गावांना धोका; गावकऱ्यांना केलंय अलर्ट!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 27 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टी व त्यामुळे लहानमोठ्या नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यांत धोकादायकरित्या वाढ झाली आहे. त्यामुळे 6 प्रकल्प 100 टक्के भरल्याने नदीकाठच्या अनेक गावांना धोका निर्माण झाला असून, हजारो गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील खडकपूर्णा व नळगंगा (75. 50 टक्के …
 
सहा सिंचन प्रकल्प तुडूंब!; नदीकाठच्या गावांना धोका; गावकऱ्यांना केलंय अलर्ट!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 27 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टी व त्यामुळे लहानमोठ्या नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यांत धोकादायकरित्या वाढ झाली आहे. त्‍यामुळे 6 प्रकल्प 100 टक्के भरल्याने नदीकाठच्या अनेक गावांना धोका निर्माण झाला असून, हजारो गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सहा सिंचन प्रकल्प तुडूंब!; नदीकाठच्या गावांना धोका; गावकऱ्यांना केलंय अलर्ट!!

जिल्ह्यातील खडकपूर्णा व नळगंगा (75. 50 टक्के ) या मोठ्या धरणातील जलसाठा धोकादायकरित्या वाढला आहे. यामुळे खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे धरणातून 1073 क्युमेक इतका विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय! नळगंगा व पेन टाकळी धरणात जलसाठा वाढल्याने धरणाची वक्राकार दारे परिचालनद्वारे उघडण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय कोराडी, ज्ञानगंगा, पलढग, उतावली हे मध्यम प्रकल्प 100 टक्के भरली. याशिवाय मन धरण 98 टक्के भरल्याने 1 गेट उघडण्यात आले. तोरणा सुद्धा 97 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भरले आहे. मस मध्यम प्रकल्पात 68 टक्‍क्‍यांच्या आसपास भरले आहे. या परिणामी परिसरातील शेकडो गावे व हजारो राहिवासीयांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी राहण्याचा इशारा देण्यात आला.

पूल गेला वाहून…
नांदुरा- मोताळा रोडवरील शेंबा (ता. नांदुरा) येथील पूल रात्रीपासून वाहून गेल्याने वाहतूक बंद आहे. नांद्राकोळी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रायपूर – बुलडाणा वाहतूक बंद आहे. पांग्री येथील रस्ता वाहून गेल्याने पांग्री- रायपूर रस्त्यावरील पूल खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सहा सिंचन प्रकल्प तुडूंब!; नदीकाठच्या गावांना धोका; गावकऱ्यांना केलंय अलर्ट!!
असा पडतोय देशभरात पाऊस…