SP अरविंद चावरिया यांचा इशारा… कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांवर अत्याचार केल्यास खबरदार…!

अशा बालकांची माहिती मिळाल्यास १०० व १०९८ हेल्पलाईन वर द्यावी बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे थैमान वाढत असताना त्यासोबत अनेक नवीन समस्या जन्म घेत आहेत. तरुण मुला-मुलींचे मृतदेह खांद्यावरून नेण्याचे संकट वृद्धांवर आले आहे तर अकाली आई-वडिलांचे छत्र हरविल्याने बालके पोरकी झाली आहेत. अचानकपणे आई-वडिलांचे छत्र हरविल्याने लहान मुलांवर मोठे संकट कोसळले आहे. परंतु …
 
SP अरविंद चावरिया यांचा इशारा… कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांवर अत्याचार केल्यास खबरदार…!

अशा बालकांची माहिती मिळाल्यास १०० व १०९८ हेल्पलाईन वर द्यावी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  कोरोनाचे थैमान वाढत असताना त्यासोबत अनेक नवीन समस्या जन्म घेत आहेत. तरुण मुला-मुलींचे मृतदेह खांद्यावरून नेण्याचे संकट वृद्धांवर आले आहे तर अकाली आई-वडिलांचे छत्र हरविल्याने बालके पोरकी झाली आहेत. अचानकपणे आई-वडिलांचे छत्र हरविल्याने लहान मुलांवर मोठे संकट कोसळले आहे. परंतु या परिस्‍थितीचाही फायदा घेणारे समाजकंटक दुर्दैवाने आपल्या समाजात दिसून येतात. कोविडमुळे पालकत्व हरविलेल्या अनाथ, असहाय्य मुलांवर अत्याचार केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चवरिया यांनी दिला आहे.

तीन दिवसांची मुलगी आणि सहा महिन्यांच्या मुलीने कोविडमुळे पालकत्व हरवले असून, अशा मुलांना नवीन जीवन मिळविण्यास मदत करा. या मोबाईल नंबरवर कॉल करा… अशा प्रकारचे मॅसेजेस व्‍हॉट्‌स अॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर या सोशल मीडियावर फिरत आहेत. वर्षानुवर्षे मूल होण्याची वाट पाहणारे संवेदनशील जोडपे अशा मेसेजला बळी पडू शकतात. तसेच लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना कोविडमुळे आयती संधी मिळत आहे. मूल दत्तक घेण्याची ही प्रक्रिया बेकायदेशीर असून असा प्रकार आढळल्यास त्यावर कडक कारवाईचे आदेश श्री. चावरिया यांनी दिले आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती ही भारतीय दंड संहिता 1860, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 तसेच दत्तक नियमावली 2017 नुसार कठोर कारवाईस पात्र असून, बुलडाणा पोलीस विभागाकडून कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. ज्या पालकांना बालक दत्तक घ्यावयाचे आहे अशा पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या ‘कारा’ ( सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या आधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करू शकतात. तसेच राज्यात कोठेही कोविड-19 चे कारणाने पालक गमावल्यामुळे अनाथ झालेली बालके आढळल्यास याबाबतची तात्काळ माहिती बुलडाणा पोलीस घटकास हेल्पलाईन १०० तसेच चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर देण्यात यावी. तसेच संपर्क साधावा अथवा सारा महाराष्ट्र (state adaption resource agency) च्या 8329041531 या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.