ST महामंडळात भरती : आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करा

बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळ बुलडाणा विभागामार्फत 2021-22 साठी तांत्रिक व्यावसायिक, आय.टी. आय. उत्तीर्ण कार्यशाळा शिकाऊ उमेदवार भरती करावयाचे आहे. त्याकरीता यांत्रिक मोटारगाडी, पत्रे कारागीर, ॲटो विजतंत्री, पेंटर, टर्नर, वेल्डर, वायरमन या व्यवसायांकरीता आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांनी www. apprenticeshipindia.org या संकेस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवार तसेच इच्छूक असलेल्या उमेदवारांनी नमुद केल्याप्रमाणे …
 

बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळ बुलडाणा विभागामार्फत 2021-22 साठी तांत्रिक व्यावसायिक, आय.टी. आय. उत्तीर्ण कार्यशाळा शिकाऊ उमेदवार भरती करावयाचे आहे. त्याकरीता यांत्रिक मोटारगाडी, पत्रे कारागीर, ॲटो विजतंत्री, पेंटर, टर्नर, वेल्डर, वायरमन या व्यवसायांकरीता आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांनी www. apprenticeshipindia.org या संकेस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवार तसेच इच्छूक असलेल्या उमेदवारांनी नमुद केल्याप्रमाणे नोंदणी केल्‍यानंतर एम.एस.आर.टी.सी. बुलडाणाविभाग आस्थापने करीता ऑनलाईन अर्ज करावे.

ऑनलाईन झालेल्या शिकाऊ उमेदवारांकरीता इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज भरावे लागतील. सदरचे छापील अर्ज आस्थापना शाखा, राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, मलकापुर रोड, बुलडाणा येथे दि. 27 जानेवारी 2021 ते 10 फेब्रुवारी 2021 पर्यत सकाळी10.ते 3 वाजेपर्यत मिळतील. तसेच तेथे लगेच स्विकारले जातील. अर्जाची किंमत (जीएसटी 18 टक्के सहीत राहील) खुल्याप्रवर्गातील उमेदवारांसाठी 590 रुपये, मागासवर्गीय शिकाऊ उमेदवारांसाठी 295 रुपये असून शुल्क उमेदवारांनी राष्ट्रीयकृतबॅंकेचा डिमांड ड्राफ्ट किंवा भारतीय डाक घर येथील पोस्टल ऑर्डर याद्वारे एम.एस.आर.टी. सी. FUND A/C BULDANA नावाने काढून अर्जासोबत सर्व कागदपत्रांसह कार्यालयात दि. 10 फेब्रुवारी 2021 पर्यत 6 वाजेपर्यत सादर करावे.तसेच खालील प्रमाणे व्यवसायनिहाय पदे भरावयाची आहे. व्यवसाय तांत्रिक मोटारगाडी (मोटार मेकॅनिकल व्हेईकल – एम एम व्हि, 30 पदे, पत्रे कारागिर 14 पदे, ॲटो विजतंत्री 6 पदे, पेंटर 4 पदे, टर्नर 2 पदे, वेल्डर 6 पदे, वायरमन 2 पदे असे एकुण 64 पदे शिकाऊ उमेदवारांनी पदे भरावयाची आहे. सदर नमुद केलेल्या संकेतस्थळावर जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील त्याच उमेदवारांना रा. प. महामंडळ बुलडाणा विभागामध्ये शिकावू उमेदवारी करता येईल. त्यांनाच शिकाऊ उमेदवार म्हणून विभागास भरती करण्यात येईल, असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभाग यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.