महाराष्ट्र

State News : आग लागून एकाच घरातील चौघांचा मृत्यू

तीन लोक गंभीर जखमी; मृतांमध्ये दोन महिलांस दोन बालकाचा समावेश
मुंबई : पालघर जिल्हयात ब्राह्ममणगाव येथे (ता.मोखडा) येथे सोमवारी पहाटे एका दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला, एक युवती व एका मुलाचा समावेश आहे. या आगीत आणखी तीन जण होरपळून गंभीर जखमी झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकाने ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. घरातील सर्व सदस्य झोपले होते तेव्हा ही दुर्घटना घडली. हे कुटुंब त्या दुकानाच राहत असे. रात्रीच्यावेळी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी. आग लागल्यानंतर ती लवकर भडकल्याने कुटुंब आगीत वेढले गेले. त्यांना बाहेरच पडता आले नाही. तासाभरानंतर आग नियंत्रणात आली. पण तोवर चार सदस्यांचा आत होरपळून मृत्यू झाला होता.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: