Sunny Leone Life Story : मॉडेल, अभिनेत्री ते समाजसेविका अन्‌ बिझनेस वुमन!

जितकी चर्चा कुण्या अभिनेत्रीची होत नाही तितकी चर्चा भारतात सनी लिओनची झाली आहे. आजही सनी आणि कोणत्याही अभिनेत्रीचे नाव घेतले तरी आधी उत्सुकता ताणली जाते ती सनीविषयी. अर्थात सनीला हे स्थान सहजासहजी मिळालेले नाही. तिला अनेक चांगल्या-वाईट अनुभवांतून जावे लागले आहेत. अनेक आडमार्ग पत्करावे लागले आहेत. कधीकाळी टीका होत असली तरी तिने बॉलीवूडमध्येही मिळवलेल्या यशाचे …
 

जितकी चर्चा कुण्या अभिनेत्रीची होत नाही तितकी चर्चा भारतात सनी लिओनची झाली आहे. आजही सनी आणि कोणत्याही अभिनेत्रीचे नाव घेतले तरी आधी उत्सुकता ताणली जाते ती सनीविषयी. अर्थात सनीला हे स्थान सहजासहजी मिळालेले नाही. तिला अनेक चांगल्या-वाईट अनुभवांतून जावे लागले आहेत. अनेक आडमार्ग पत्करावे लागले आहेत. कधीकाळी टीका होत असली तरी तिने बॉलीवूडमध्येही मिळवलेल्या यशाचे आज कौतुकही होत आहे. अनेकांच्या गळ्यातील ताईत सनी बनली आहे.

असे आहे आयुष्य…

सनी लिओनचे खरे नाव करणजीत कौर वोरा असून तिचा जन्म कॅनडामधील ओंटारिओ येथे 13 मे 1981 रोजी पंजाबी- शीख कुटुंबात झाला. तिच्या कुटुंबाचे वेगळेपण सांगायचे तर तिच्या वडिलांचा जन्म हा तिबेटचा असून, तिची आई हिमाचल प्रदेशची आहे. वडिलांचे लहानपण दिल्लीत गेले. पण कामानिमित्त ते कॅनडाला राहू लागले. सनीला एक लहान भाऊ असून, त्याचे नाव संदीप सिंह वोरा आहे. तो सध्या शेफ म्हणून नावारुपाला आला आहे. तिचे काही शिक्षण ओंटारिओ येथील कॅथलिक शाळेत झाले. कॅथलिक शाळेत मुलांना घालणे टीपिकल शीख कुटुंबाला धोक्याचे वाटत होते. म्हणूनच त्यांनी कॅनडा सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते अमेरिकेतील कॅलिफोर्नियात स्थिरावले. सनीने तिचे कौमार्य वयाच्या सोळाव्या वर्षी घालवले. सनीच्या घरातील परिस्थिती बेताची होती. त्यातच वडिलांचे काम सुटल्यामुळे तिला काम करणे गरजेचे झाले. म्हणून ती जर्मन बेकरीमधून काम करू लागली. तिथे काम करून मिळणारा पैसा तिच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकेल एवढा नव्हता. त्यामुळे तिने मॉडेलिंगही सुरू केले. त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या penthouse या पुरुषांच्या इरॉटिक मॅगझीनमध्ये तिने एक अॅडल्ट फोटो काढला. या फोटोनंतर तिच्या करिअरला एक वेगळेच वळण मिळाले. Penthouse चा pet of the year 2003 चा मान तिला मिळाला. यासाठी तिला मिळालेल्या बक्षीसाची रक्कम सगळ्यांचेच प्रश्न सोडू शकेल अशी होती. यानंतर खऱ्या अर्थाने तिच्या पुढील प्रवासाला सुरुवात झाली. सनी ही पहिली साऊथ एशियन मॉडेल होती जी या मासिकाच्या कव्हरमधून झळकलेली होती.

तिथेही स्ट्रगल
सनी लिओनचा पॉर्न इंडस्ट्रीमधील स्ट्रगलही तितकाच महत्वाचा आहे. या इंडस्ट्रीतून तिला पैसा तर मिळत होता. तिने या इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर तिला काही नियमांखालीच काम करायचे होते. त्यामुळे तिची या ठिकाणी अस्तित्वाची लढाई होती. लोकांना आपण आवडत आहोत हे माहीत असताना ते टिकवून ठेवण्यासाठी अन्य स्टार्सपेक्षा तिला काहीतरी वेगळे करणे गरजेचे होते. सनी लिओनच्या कामासोबतच तिच्या लव अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच गाजल्या. आधी तिने अनेक सोलो व्हिडिओ केले आहेत. vivid entertainmet चा करार साईन करताना तिने तिचा फियाॅन्से मॅट इरिक्सनसोबत काम करणार असल्याचे सांगितले. त्याच्यासोबत तिने काही व्हिडिओ केले सुद्धा; पण लग्नाच्या काहीच दिवस आधी तो फसवणूक करत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने त्याला आयुष्यातून बाहेर काढले. त्या आधी ती रसेल पिटरसोबत नात्यात होती. रसेल हा स्टँडअप कॉमेडिअन म्हणून प्रसिद्ध आहे. पण ही दोघं 2007 मध्ये वेगळी झाली. त्यानंतर तिच्या आयुष्यात मॅट आला. त्यानंतर तिच्या आयुष्यात डॅनिअल वेबर आला. तिने 2011 साली त्याच्याशी लग्न केले.

आडमार्ग का निवडला?
अनेकदा वाईट गोष्टी किंवा वाईट काम करण्याचा निर्णय हा अपरिहार्य कारणांमुळे घेतला जातो. सनीकडे अपरिहार्य असे काही कारण नव्हते. तिला penthouse च्या यशानंतर एक आत्मविश्वास आला होता. घरात ती कमावती असल्यामुळे यापुढे तिने अॅडल्ट इंटरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये काम करायचे ठरवून टाकले. तिच्या या निर्णयावर घरातील अनेकांचा आक्षेप असला तरी तिचा भाऊ संदीप सिंह वोरा (शेफ) याने तिला कायमच तिच्या कामासाठी पाठिंबा दिला. तिने vivid entertainment मधून तिच्या अश्लील टेपला सुरुवात केली. तिच्या टेप फारच प्रसिद्ध झाल्या. पण करणजीत कौर या नावाने काम करणे तिला शक्य नव्हते. म्हणून नाव बदलण्याचा निर्णय घेतला. तिने तिचे नाव ‘सनी’ असे ठेवले तर ‘लिओन’ हे नाव तिला penthouse मासिकाचा मालक याने दिले. याशिवाय ती किरण मल्होत्रा या नावाने देखील ओळखली जात होती. पण पुढे केवळ सनी नावाने ओळखली जाऊ लागली. त्यामुळे तिचे खरे नावही अनेकांना तेच वाटत होते. अॅडल्ट फिल्मशिवाय तिने अनेक मासिकांसाठी अॅडल्ट फोटोशूट केले आहे.

सनी लिओनबद्दल…
पॉर्नस्टार, अभिनेत्री आणि मॉडेल अशी सनीची ओळख आहे. अनेक अॅडल्ट मुव्हिजमध्ये तिने यापूर्वी काम केले आहे. या इंडस्ट्रीतील चेहरे खरेतर प्रसिद्ध होत नाहीत. पण सनीने तिची वेगळी ओळख बनवली आणि वाढवलीही. तिलाही बॉलीवूडमध्ये येण्याचा मोह आवरला नाही. पॉर्न इंडस्ट्री सोडून बॉलीवूडमध्ये तिने पाऊल ठेवले. बिग बॉसमधून तिने भारतीय कलाविश्वात पाऊल ठेवले. त्यानंतर तिला मागे पहावे लागले नाही. ती वेगवेगळ्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर येतेच पण स्वत:ची कॉस्मेटिक उत्पादनांची रेंजही बाजारात आणली आहे. त्यामुळे पॉर्नस्टार ते बिझनेस वुमन आणि अभिनेत्री ते समाजसेविका अशी तिची नवी ओळख आहे.

बॉलीवूडमध्ये एंट्री अन्‌ स्ट्रगल
सनी लिओनला बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा होती. तिचा बॉलीवूडमधील प्रवासही खडतर होता. पण तिला चांगल्या संधी मिळाल्या. 2011 साली बिग बॉस सीझन 5 मध्ये आली. या स्पर्धेत तिने स्वत:ची ओळख मॉडेल म्हणून सांगितली. तिची प्रसिद्धी या काळात इतकी वाढली की, लोकांनी तिला गुगलवर सर्च केले पण त्यानंतर ती एक पॉर्नस्टार असल्याचे कळले. त्यानंतर तिला अनेक विरोधकांना सामोरे जावे लागले. पण त्यानंतर तिला चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्ससुद्धा आल्या. महेश भट यांनी तिला 2011 मध्ये ‘जिस्म2’ या चित्रपटाची ऑफर दिली. ती ऑफर तिने स्विकारली. हा चित्रपट हिट चित्रपटांच्या यादीत नसला तरी या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला. त्यानंतर तिला रागिनी MMS चा सिक्वल असलेल्या ‘रागिनी MMS2’ साठी निवडण्यात आले. या चित्रपटातही तिने चांगले काम केले. यानंतर ती ‘शूट आऊट अॅट वडाळा’ या चित्रपटात आयटम साँग केले. या शिवाय ‘एक पहेली लिला’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘मस्तीजादे’, ‘रईस’, ‘वन नाईट स्टँड’ अशा चित्रपटांमधूनही कामे केली.

असे बहरले करिअर
सनी लिओनने girls next door( 2004) यातून करिअरला सुरुवात केली. जिस्म (2011), जॅकपॉट (2013), शुट आऊट अॅट वडाळा (2013),कुछ कुछ लोचा है (2015), एक पहेली लिला (2015), रागिनी mms 2 (2014),सिंग इज ब्लिंग (2015), वन नाईट स्टँड (2016),तेरा इंतजार (2017), बॉईज (2017), लैला मे लैला गाणं (रईस, 2017), करणजीत कौर द अनटोल्ड (2018-2019) या शिवाय तिने अनेक टीव्ही शोज केले आहे. या मध्ये Mtv rodies, splitsvilla, बेईमान ईश्क या चित्रपटात तिने काम केली आहेत.

तिला नक्की काय आवडतं?

  • सनीला अभिनयाव्यतिरिक्त खेळाची आवड आहे. ती उत्तम फूटबॉल प्लेअर आहे. तिने तिच्या तरुणपणात अनेक लहानमोठ्या टिममधून तिच्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. याशिवाय तिला क्रिकेट पाहायला आवडते. ती चेन्नई स्वॅगर्स या टीमची मालक आहे.
  • सनी लिओन इतके वर्ष अमेरिका आणि कॅनडाला राहून देखील तिला भारतीय पदार्थांची आवड आहे. तिला चाट खायला खूप आवडतात. दहीपुरी ही तिचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे.
  • सनी लिओन जरी पार्टी क्रेझी वाटत असली तरी ती नाही. तिला पार्टीमध्ये जाण्यात कोणताच रस वाटत नाही. त्यापेक्षा तिला तिचा वेळ घरी घालायला आवडतो. तिला वाचनाची आवड असून तिने पुस्तकं सुद्धा लििहली आहे.
  • तिचे आयुष्य नक्कीच वाटले होते तितके सोपे नाही. तिने काही चुका आयुष्यात केल्या. पण त्या चुकांना कुरवाळण्यात तिला काही रस नाही.

गुगल सर्चमध्ये सर्वांत पुढे…
सनी लिओनला आता प्रत्येक जण ओळखतात. तिला जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे म्हणूनच इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत तिचा गुगल सर्च अधिक आहे. सनी लिओन आपली स्वत:ची एक वेबसाईट चालवते. ती पॉर्नस्टार, मॉडेल, अभिनेत्री आणि व्यवसायिका आहे. कारण तिचा LUST नावाचा परफ्युम फारच प्रसिद्ध आहे. या शिवाय तिच्या अनेक चांगल्या कामांमुळे लोकांसमोर असते. यामुळेच इतरांच्या तुलनेत सनी लिओन यामध्ये पुढे असावी.

काय होत सनीच्या web seriesमध्ये
सनी लिओनने तिचा प्रवास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिची एक वेबसिरिज काढली होती. करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी असे या वेबसिरिजचे नाव होते. यामध्ये तिने तिची सगळी कहाणी या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला पडलेल्या सनी लिओनच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिने यातून दिलेली आहेत. याला देखील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. सनी लिओनच्या करिअरसोबत काही कॉन्ट्राव्हर्सीजही चांगल्या गाजल्या. मे 2015 रोजी तिच्या विरोधात पहिली तक्रार दाखल करण्यात आली. तिचे बॉलीवूडमधील पदार्पण तिच्या कामामुळे अनेकांना खटकत होते. ती चालवत असलेल्या sunnyleone.com विरोधात होती. त्यावरील आक्षेपार्ह गोष्टींविरोधात ही तक्रार करण्यात आली होती. तिच्या गुन्ह्यांतर्गत तिला पोलीस कोठडी सुनावली जाऊ शकली असती. पण या प्रकरणातून तिची सुटका झाली. 2017 नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सनी लिओनचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पण या कार्यक्रमाविरोधात तेथील युवकांनी आंदोलन केले होते. तिला कार्यक्रमाची परवानगी दिली तर आत्मदहन करण्याचा इशारा येथील युवा सेनेकडून देण्यात आला होता. त्यामुळे सनी लिओनचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. 2018 साली एक समाजसेवकाने तिच्या विरोधात चेन्नईमध्ये तक्रार दाखल केली. त्याने सनी लिओनही समाजासाठी घातक असल्याचे म्हटले आणि त्याने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. या शिवाय ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटात ती एक आयटम साँग करणार होती. या चित्रपटासाठी तिला 5 लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आले होते. पण तिने पैसे देऊनही काम केले नाही अशी तक्रार करण्यात आली होती. पण सनीने या बातमीचे खंडन केले होते.